देवघरातील कुलदैवतांचे टाक

अनादी काळा पासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्गिक शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवता मधील कुलदेवतांचे स्थान त्याचे दृष्टीने महत्वपूर्ण कुळाचे आचाराने देव हे त्या कुळाचे कुलदैवत या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात
कुलदैवतांचे टाक धातू पासुन बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे. निसर्गाच्या मुळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताचे आधारे केली जाते. जीवन हे पंचतत्वा पासुन निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतिक म्हणून टाक हा पंचकोनी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतिक या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमेचा भाग बनवण्या साठी केला जातो त्याच प्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतिक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ट भागा साठी केला जातो.
मुखभाग व पृष्टभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ /लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो हा उर्जे चे प्रतिक आहे व उर्जा हाच जीवनाचा आधार मानला जातो.
या पद्धतीने निर्माण केलेले कुलदैवतांचे टाक महाराष्ट्रातील प्रत्येक घरात मध्ये दिसतात कुटुंबाचे रोजचे पुजे साठी व नैमेतिक कुलधर्म कुलाचारासाठी कुळातील प्रत्येक देव घरात टाक असलेच पाहिजेत असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे