देवघरातील टाकांची देखभाल


# देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत , गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात, ओला गंध लावू नये.
# दही, दुध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पुजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकट पण पुर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत.
# टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर व केमिकलचा उपयोग करू नये.
# सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास चिंच, लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा. अथवा टूथपेष्ट व मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा.
# देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा टाकान पासुन दूर लावावा, त्याचा तेलकटपणा टाकान वर चढणार नाही याची दक्षता घ्यावी.
# टाक हाताळताना त्यांचे असलेल्या कोनावर टाक खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. टाक कोनावर खाली पडल्याने त्याचे किनारीची पक्कड सैल होऊ शकते.
# आपण आपल्या देव घरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील.