खंडोबा व जेजुरी विषयक माहिती



जेजुरी विषयक माहिती साठी अपणास जी माहिती हवी आहे त्या पुढील पर्याया वर किल्क करा 


जेजुरीगड -
खंडोबाची राजधानी मानला जाणारा जेजुरीगड याचे मार्गावरील विविध  देवता त्यांचे ग्रांथिक व जनश्रुतीची माहिती या मार्गाचा बांधकाम काळ त्याचे कर्ते यांच्या माहिती सह जेजुरी गड व  मंदिर परिसरातील देवदेवता यांची ग्रांथिक माहिती निर्मितीकाल, निर्माते  यांच्या माहिती सह  मंदिर व गड कोट परिसराचे सचित्र दर्शन


कडेपठार -
 खंडोबाचे अवतार स्थान मानले जाणारे कडेपठार मंदिराचे दोन्ही मार्गावरील देवता त्यांचे ग्रांथिक व जनश्रुती मधील संधर्भ या सह  पायरीमार्ग व मंदिर यांचे सचित्र दर्शन



यात्रा उत्सव परंपरा -
गड व कडेपठारी होणारी भूपाळी, धूपआरती, शेजआरती हे  देनंदिन कार्यक्रम यांचे चित्रफिती द्वारा दर्शन , येथे वर्षभर होणाऱ्या चैत्र पौर्णिमा, सोमवती, गणपुजा, दसरा, चंपाषष्टी, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, या उत्सवाची सचित्र माहिती व चित्रफिती द्वारे दर्शन, गुरु पौर्णिमा, नाग पंचमी, श्रीयाळषष्टी, छबिना, त्रिपुरी पौर्णिमा, जानाई देवी उत्सव या  वर्षभर साजरे होणारे स्थानिक उत्सवांचे सचित्र व चित्रफिती द्वारे दर्शन व माहिती.


जेजुरीतील प्रेक्षणीय स्थळे -
जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर मंदिर, होळकर तलाव,  बल्लाळेश्वर, लवथळेश्वर मंदिर,जानाई मंदिर, मल्हारतीर्थ, जननी तीर्थ,लव तीर्थ, पेशवे तलाव इत्यादी प्रेक्षणीय स्थळे यांचे संधर्भासह सचित्र दर्शन



भौगोलिक व पर्यावरण -
 जेजुरीचे भौगोलिक स्थान, हवामान, यांची नकाशे आलेख या द्वारे सचित्र माहिती जेजुरी परिसरातील  जैवविविधता यांची सचित्र माहिती


जेजुरी ऐत्यहासिक, सांस्कृतिक -
 जेजुरीतील ऐत्यहासिक घटनांचा माहितीसह सचित्र इतिहास , जेजुरीचे भूमीतील शीघ्रकवी सगनभाऊ,  लावणी सम्राज्ञी रोशन सातारकर, चित्रअभिनेत्री  लीला गांधी  सारख्या येथील नामवंत कलाकारांचा जीवन परिचय व येथील लोककलेची सांस्कृतिक परंपरा याची माहिती


जेजुरी परिसरातील प्रेक्षणीय स्थळे -
 जेजुरी परिसरातील  शंकरेश्वर, रामेश्वर [ साकुर्डे ] , पांडेश्वर, भुलेश्वर, नागेश्वर [ नाझरे], वाल्मिकी ऋषी समाधी [ वाल्हे ], मयुरेश्वर [ मोरगाव],संत सोपानदेव समाधी, संगमेश्वर, सिद्धेश्वर [ सासवड ], जवळार्जुन , चतुर्मुख [ गराडे ], महादेव [ हरणी ], वाल्मिकी तपोभूमी [ कोळविहीरे], वाघेश्वरी [ पिंगोरी], हरेश्वर, यमाई [ शिवरी ], नारायणपूर, बालाजी [ केतकवळे ], म्हस्कोबा [वीर], सोमेश्वर [ करंजे ], कानिफनाथ, गुळुंचे, आंबळे, कुमजाई, किल्ले पुरंदर, वज्रगड, मल्हारगड [ सोनोरी], या विविध मंदिरे, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे यांचे संधर्भासह सचित्र दर्शन


खंडोबा परिवार देवता, पुजा प्रतीके, धार्मिक विधी -
 खंडोबाच्या देवता परिवारात  पुजल्या जाणाऱ्या  हेगडी प्रधान, म्हाळसा, बाणाई, घोडा, कुत्रा, या परिवार देवताची सचित्र माहिती, उपासनेत व देवघरात पुजली जाणारी टाक, मुर्ती, ही पुजा प्रतीके व दिवटी, गाठा, शिक्का, घोळ, कोटंबा, भंडारी, लंगर, घाटी या प्रतीकांची सचित्र माहिती, वाघ्या मुरुळी हे उपासक, व तळी भंडार, जागरण, चंपाषष्टी घट, या  कुलधर्म  कुलाचाराची व  विविध पूजा विधी, आरती, मंत्र, श्लोक याची सचित्र व चित्रफिती  द्वारे माहिती



खंडोबा ग्रंथ, साहित्य, लोकवाणी -
 खंडोबा विषयक मल्हारी महात्म्य, जयाद्री महात्म्य, मार्तंड विजय, या  विविध ग्रंथांचा परिचय,  श्री मार्तंड भैरव अवतार सचित्र कथासार,  विविध लोकगीते व  वाघ्या मुरुळी या उपासकांचे वाणी तून घडणारे खंडोबा जेजुरी चे दर्शन,  व संत नरहरी सोनार, संत जनाबाई, संत एकनाथ , संत तुकाराम , रामदास स्वामी  इत्यादी संतांचे आरती, भारुड, अभंग या  लिखाणातून  होणारे खंडोबा  दर्शन प्रातिनिधिक रचना सह सचित्र माहिती .