कुलदैवतांचे टाकांची रचना

महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील देवघरात पुजे मध्ये कुलदैवतांचे टाक असतात देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी पाच, सात, नऊ, अकरा अश्या वेगवगळ्या संखेत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवते ही आढळतात, प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष, इत्यादी दैवतांचा समावेश होतो कुटुंबाचे कुळाचे मुळ ठिकाण, जात, कुळ, इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो,त्या मुळे प्रत्येकाची कुलदेवते बदललेली असतात. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वच घरा मध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सातीआसरा, अश्या कितीतरी विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळा मधून कुलदैवता मध्ये दिसतात, जोतीबा, रवळनाथ, वीर, बापदेव, अशी अनेक पुरुष दैवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानी ओळखली जातात, काही परिवारा मध्ये पूर्वज [ पितर] यांची ही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते, तर काही भागात चेडा, वेताळ, मुंज्या, अशी वेगळ्या वर्गातील देवतांची स्थापना देवघरात दिसते, एकंदर जात, कुळ, निवासाचा परिसर, मुळ निवास, या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांचे रचनेवर असतो, त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराचे परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते. आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग संखेत तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे, आपल्या देव घरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निषिद्ध मानले जातात. त्यामुळे या पारंपारिक संकेतांचे दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे. आपल्या पूर्वजांनी दिलेली आपल्या कुलधर्म कुलाचाराची परंपरा प्रत्येक परिवारास असतेच असे नाही तेव्हा योग्य ते मार्ग दर्शन गरजेचे असते आपल्या परिसरातील स्थानिक लग्न, पुजा, जोतिष सांगणारे व विविध विधी करणारे पुरोहित, भगत त्याच प्रमाणे सत्संग, केंद्र, बैठक, असे धार्मिक जागृती करणारे यांना या विषयातील परिपूर्ण ज्ञानाचे मर्यादा असतात त्यामुळे त्यांचे कडून देव घरातील टाकांचे रचने विषयी योग मार्गदर्शन मिळेलच असे नाही म्हणून योग्य अश्या व्यक्ती कडून मार्ग दर्शन घ्यावे.